नगराध्यक्षासह १२ जणांना कारावास
By Admin | Updated: January 14, 2015 04:42 IST2015-01-14T04:42:23+5:302015-01-14T04:42:23+5:30
मालवण रेवतळे येथे महिलेसह तिच्या पतीला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणात नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्यासह १२ जणांना प्रमुख जिल्हा

नगराध्यक्षासह १२ जणांना कारावास
सिंधुदुर्ग : मालवण रेवतळे येथे महिलेसह तिच्या पतीला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणात नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांच्यासह १२ जणांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील कोतवाल यांनी दोषी ठरवत २ वर्षे कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनावली़ इतर तिघांना दोषमुक्त करण्यात आले.
मालवण न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात जिल्हा न्यायालयात आरोपींमार्फत अपील दाखल केले होते. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत मालवण न्यायालयाने या सर्व आरोपींना दोषी ठरवत १५ आरोपींना शिक्षा दिली होती. याविरोधात आरोपींनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती़ मंगळवारी झालेल्या सुनावणीत जिल्हा सत्र न्यायालयाने मालवण न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला़ (प्रतिनिधी)