१२ अधिकारी झाले आयएएस!

By Admin | Updated: July 10, 2016 04:37 IST2016-07-10T04:37:11+5:302016-07-10T04:37:11+5:30

राज्यातल्या १२ अधिकाऱ्यांना शनिवारी केंद्रीय नागरी सेवेत (आयएएस) बढती देण्यात आली. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच ज्या वर्षी पदे रिक्त झाली, त्याच वर्षी त्यांना आयएएस होण्याची

12 officers became IAS! | १२ अधिकारी झाले आयएएस!

१२ अधिकारी झाले आयएएस!

- अतुल कुलकर्णी, मुंबई

राज्यातल्या १२ अधिकाऱ्यांना शनिवारी केंद्रीय नागरी सेवेत (आयएएस) बढती देण्यात आली. गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच ज्या वर्षी पदे रिक्त झाली, त्याच वर्षी त्यांना आयएएस होण्याची संधी मिळाली आहे.
राज्य नागरी सेवेतून केंद्रीय नागरी सेवेत पदोन्नतीने जागा भरल्या जातात. दरवर्षी आयएएसच्या जेवढ्या जागा रिक्त होतात तेवढ्या भरण्याची शिफारस केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे केली जाते. मात्र या जागा भरण्यास पात्र असलेल्यांना तीन ते चार वर्षे वाट पहावी लागलेली आहे. गेल्या दहा वर्षांत त्या वर्षीच्या रिक्त जागा त्याच वर्षी भरल्या गेल्याचे आताचे हे एकमेव उदाहरण आहे. आता १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत १३ आयएएसच्या जागा रिक्त होणार आहेत. त्यांच्या (पान १0 वर)

सर्व अधिकारी ज्येष्ठ

विधळे हे तत्कालीन मंत्री राजेंद्र शेंडगे यांचे स्वीय सचिव तसेच एमएमआरडीएमध्ये कार्यरत होते. तर राजेश नार्वेकर हे महसूल विभागातील अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जातात. संजय यादव हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयात ओएसडी होते तर योगेश म्हसे हे माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे स्वीय सचिव तसेच पिंपरी-चिंचवड प्राधिकरणात कार्यरत होते. कमलाकर फंड हे विलासराव देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी होते.

Web Title: 12 officers became IAS!