शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

पंढरीत तयार होतोय तब्बल बारा लाख लाडूंचा प्रसाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 15:11 IST

तयारी आषाढीवारीची...भक्ती सोहळ्याची;  ४ आचारी, ७० महिला व २० पुरुष लागले कामाला 

ठळक मुद्देश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून सुवर्णक्रांती महिला गृहउद्योग सहकारी संस्थेला लाडू बनविण्याचे काम देण्यात आलेकाही दिवसांवर आषाढी एकादशीचा सोहळा आहे, यामुळे पंढरीत लाखो भाविक दाखल होत आहेत१२ लाख लाडू बनविण्याचे नियोजन सुरु आहे. एकाच वेळी सर्व लाडू न बनविता मागणीनुसारच लाडू बनविण्यात येणार आहेत

पंढरपूर : पंढरपुरात आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेले लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचा प्रसाद म्हणून लाडू घेऊन जातात. यामुळे यात्रेत येणाºया गर्दीचा अंदाज घेत यंदा १२ लाख बुंदीचे लाडू बनविण्याचे काम सुरू आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून सुवर्णक्रांती महिला गृहउद्योग सहकारी संस्थेला लाडू बनविण्याचे काम देण्यात आले आहे. काही दिवसांवर आषाढी एकादशीचा सोहळा आहे. यामुळे पंढरीत लाखो भाविक दाखल होत आहेत. भाविक मोठ्या श्रध्देने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू आपल्या गावी नेतात. मंदिर समितीने मागील वर्षीपेक्षा यंदा जादा २ लाख लाडू बनविण्याचे काम सुरु केले आहे. यामुळे १२ लाख लाडू बनविण्याचे नियोजन सुरु आहे. एकाच वेळी सर्व लाडू न बनविता मागणीनुसारच लाडू बनविण्यात येणार आहेत. 

लाडू बनविण्याचे काम ४ आचारी, ७० महिला व २० पुरुष कर्मचाºयांमार्फत सुरूआहे. लाडू बनवत असताना अन्न व औषध विभागाकडून दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले जाते. यामध्ये सर्व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी करुन घेणे, डोक्याला कॅप वापरणे, अंतर्गत स्वच्छता ठेवणे या सूचनांचा सहभाग आहे. केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. दोन लाडूचे वजन अंदाजे १४० ग्रॅम इतके असते. हे लाडू मंदिर समितीला साडेबारा रुपयांना दिले जातात. मंदिर समिती दोन लाडूची पिशवी भाविकांना १५ रुपयांना विक्री करते. लाडू विक्रीतूनदेखील मंदिर समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. 

पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून येणाºया भाविकांना घरी लाडवाच्या रुपाने प्रसाद घेऊन जाता यावा या उद्देशाने मंदिर समितीच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

प्लास्टिकला छुट्टी, पर्यावरण पिशवीचा वापर- लाडू प्रसाद विक्री करण्यासाठी प्लास्टिक पिशवी न वापरता पर्यावरणपूरक पिशवी वापरण्यात येत आहे. बुंदीचा लाडू भाविकांनी १० ते १२ दिवसांमध्ये खावा, अन्यथा तो लाडू खराब होऊ शकतो, असे कविता खडतरे यांनी सांगितले.

लाडूसाठी लागणारे साहित्य - लाडूसाठी लागणारे साहित्य साखर - २० टन, तेल - २० टन, हरभरा - २५ टन, बेदाणा - १ टन, १ लाख रुपयांचे वेलदोडे , लाडूतील पौष्टिक तत्वे, ऊर्जा ४७६.४७ , प्रथिने ७.७५ टक्के, कर्बोदके ५५.३२ टक्के, चरबी २४.९१ टक्के

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा