अकरावीची प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासूनच- विनोद तावडे

By Admin | Updated: June 20, 2017 16:45 IST2017-06-20T16:24:09+5:302017-06-20T16:45:16+5:30

करावीची प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासून सुरू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केली आहे.

11th entry from June 22 - Vinod Tawde | अकरावीची प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासूनच- विनोद तावडे

अकरावीची प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासूनच- विनोद तावडे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 20 - अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया 22 जूनपासून सुरू करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी केली आहे. अकरावीची प्रवेशप्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी उद्याच्या दिवसात दूर करणार असून, परवापासून ऑनलाइन प्रवेश प्रकिया सुरळीत होईल, असंही विनोद तावडे म्हणाले आहेत. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  

गणितात नापास म्हणजे आयुष्यात नापास असं होत नाही. गणिताला पर्यायी विषयच ठेवणार, असंही विनोद तावडेंनी स्पष्ट केलं आहे. गणिताला पर्यायी विषय ठेवण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचं आश्वासनंही तावडेंनी दिलं आहे. तत्पूर्वी कला शाखेत प्रवेश घेण्यासाठी किंवा व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी गणिताची अजिबात आवश्यकता नसते. त्यामुळे इयत्ता दहावीत हा विषय ऐच्छिक ठेवण्याचा विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य शिक्षण मंडळाला सोमवारी केली होती.

(आर्ट्सला जायचेय, तर गणित कशाला?)

शाळेत शिक्षण घेताना, विशेष मुलांनाही होत असलेला त्रास व राज्य शिक्षण मंडळाने या संदर्भात उचललेली पावले, या दोन मुद्द्यांवर प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ हरिश शेट्टी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे व न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी गणित आणि भाषांमध्ये उत्तीर्ण होण्याची क्षमता नसल्याने दहावीनंतर शिक्षण अर्धवट सोडण्याचे प्रमाण जास्त आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते. कला किंवा अन्य व्यावसायिक शिक्षणात पदवी घेण्याकरिता गणिताची आवश्यकता नाही. त्यामुळे गणिताच्या अभ्यासाची सक्ती केली नाही, तर विद्यार्थी किमान पदवीधर तरी होतील, असेही न्यायालयाने सुनावणीत म्हटले होते.

जुनी पद्धत पुन्हा अंमलात आणा

गणित किंवा गणिताशिवाय सात विषयांत उत्तीर्ण झाल्यास, पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची परवानगी यापूर्वी राज्य शिक्षण मंडळ देत होते. त्यांनी (शिक्षण मंडळ) हे बंद करण्याचा निर्णय का घेतला, हे कळत नाही. जुनी पद्धत पुन्हा एकदा अंमलात आणण्याचा विचार करा, असे म्हणत न्यायालयाने तज्ज्ञांकडून याबाबत सल्ला घेण्याची सूचनाही राज्य सरकारला केली.

Web Title: 11th entry from June 22 - Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.