शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मेळघाटातील कोवळी पानगळ गोरखपूरलाही लाजवणारी, २२ वर्षांत ११,४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 20:07 IST

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वर्षभरात १३०० बालकांचा मृत्यू झाल्याने केंद्र व राज्य शासन गंभीर झाले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या २२ वर्षांत ११ हजार ४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना केंद्र व राज्य शासन मात्र फारसे गंभीर नाही.

अमरावती, दि. 4 - उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे वर्षभरात १३०० बालकांचा मृत्यू झाल्याने केंद्र व राज्य शासन गंभीर झाले आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या २२ वर्षांत ११ हजार ४३६ कुपोषित बालकांचा मृत्यू झाला आहे. अशी भयावह स्थिती असताना केंद्र व राज्य शासन मात्र फारसे गंभीर नाही. मुळात बालमृत्यू रोखण्यासाठी वरवरची मलमपट्टी नको तर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे.आदिवासीबहूल मेळघाट क्षेत्रात सनन १९९६ ते २०१७ या कालावधीत ११ हजार ४३६ बालमृत्यू ( उपजतमृत्यू व बालमृत्यू) झालेत. म्हणजेच वर्षाकाठी सरासरी ५१९ बालमृत्यू होत आहेत. यासोबतच मातामृत्यू देखील होत आहेत. ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजरवाणी बाब आहे. मेळघाटातील कोवळ्या पानगळीचे कारण समजून घेण्यासाठी सन १९९३ पासून मुख्यमंत्री, राज्यपाल, न्यायमूर्ती, आरोग्यमंत्री, सरसंघचालक, सोनिया गांधी यांच्यासह अनेक समिती प्रमुखांचे दौरे झालेत.मागील २३ वर्षांपासून मुंबई व नागपूरच्या उच्च न्यायालयात जनहित याचिकांवर सुरू झालेला प्रश्नोत्तराचा तास अद्यापही संपलेला नाही. यावर काम करणारे अभियोक्ता अद्यापही मेळघाटात येऊन बालमृत्युची कारणे समजून घेऊ शकलेले नाहीत. कालचे विरोधक आणि आजच्या शासनकर्त्यांनी त्याकाळात मेळघाटातील बालमृत्यूचा प्रश्न सातत्याने पेटता ठेवला. आज मात्र त्यांना या भीषण वास्तवाचा विसर पडला. मेळघाटातील ‘खोज’ संस्थेने हा प्रश्न न्यायालयात सातत्याने लावून धरला आहे. याचिकाकर्ते अ‍ॅड. पूर्णिमा उपाध्याय व अ‍ॅड. बी.एस. साने मात्र आजही तेवढ्याच जिद्दीने न्यायालयासमोर हा मुद्दा मांडत आहेत आणि हाच एकमात्र आशेचा किरण आहे. राजकीय पक्षांद्वारा मात्र या कुपोषणाचे भांडवल करीत राजकीय पोळी शेकण्यावरच भर दिला जात आहे. केवळ १५ दिवसांसाठी येतात बालरोगतज्ज्ञमेळघाटात दर्जेदार आरोग्यसेवाही नाही. हे देखील बालमृत्यू होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. कित्येक वर्षानंतर एक बालरोगतज्ज्ञ आलेत आणि गेलेत. आता पुन्हा एक बालरोगतज्ज्ञ १५ दिवसांसाठी येत आहेत. एवढी गंभीर स्थिती असताना शासकीय यंत्रणाच गंभीर नसल्याने समस्या वाढत आहे. मेळघाटात कायमस्वरूपी बालरोगतज्ज्ञ मिळू नये, ही प्रगत म्हणविणाऱ्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे.

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार