डॉ.आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरसाठी ११३ कोटी
By Admin | Updated: September 10, 2014 00:50 IST2014-09-10T00:50:52+5:302014-09-10T00:50:52+5:30
कामठी रोडवरील लाल गोदामाजवळ उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरसाठी ११३ कोटी ७४ लाख रु पये अनुदान देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

डॉ.आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरसाठी ११३ कोटी
मंत्रिमंडळाची मंजुरी: लवकरच निविदा
नागपूर : कामठी रोडवरील लाल गोदामाजवळ उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरसाठी ११३ कोटी ७४ लाख रु पये अनुदान देण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या आंतरराष्ट्रीय केंद्राच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटाची व त्यांनी केलेल्या कार्याची माहिती अधिक व्यापकपणे जगासमोर मांडली जाईल.
उत्तर नागपुरात उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी नासुप्रला नोडल एजन्सी म्हणून नेमण्यात आले आहे. ७५०० चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प साकारला जाईल. १ आॅक्टोबर २०१३ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.