शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

‘त्या’ 111 मराठा उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग माेकळा; सरकारचा निर्णय याेग्य : उच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 06:55 IST

मराठा समाजाला आर्थिक मागास प्रवर्गात समाविष्ट करू घेता येणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) २ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा उमेदवारांना आर्थिक मागास वर्गात समाविष्ट करण्याचा राज्य सरकारचा २३ डिसेंबर २०२० रोजीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने योग्य ठरविला. तसेच, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) आरक्षित जागांवर समाविष्ट करण्यात आलेल्या सरकारच्या वेगवेगळ्या विभागांतील विविध पदांसाठी अर्ज केलेल्या १११ जणांच्या नियुक्तीला दिलेली स्थगिती न्यायालयाने उठविली. त्यामुळे वर्षभरानंतर संबंधितांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व नियुक्त्या वन विभाग, कर विभाग आणि अभियांत्रिकी सेवा विभागातील आहेत. 

मराठा समाजाला आर्थिक मागास प्रवर्गात समाविष्ट करू घेता येणार नाही, असा निर्णय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) २ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला होता. मॅटचा हा निर्णय न्या. नितीन जामदार व न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने रद्द केला. 

‘मॅटने केवळ त्या भरतीपुरता आणि अर्जदारांपुरता विचार करून निर्णय द्यायला हवा होता. त्याऐवजी मॅटने सरकारची २३ डिसेंबर २०२० ची पूर्ण अधिसूचनाच रद्द केली. त्यामुळे या भरतीशी संबध नसलेल्या संपूर्ण मराठा उमेदवारांच्या हक्कांवरही परिणाम झाला,’ असे निरीक्षण उच्च न्यायालयाने निकालात नोंदविले आहे. 

nराज्य सरकारने भरती प्रक्रियेच्या अखेरच्या टप्प्यावर नियम बदलले, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ईडब्ल्यूएस कोट्यातील उमेदवारांनी न्यायालयात केला. मात्र, मराठा समाजातील उमेदवारांना ईडब्यूएस कोट्यात समाविष्ट करताना राज्य सरकारने ऐनेवळी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही नियमात बदल केलेले नाहीत, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. 

न्यायालयाने या १११ जणांच्या चार आठवड्यांत नियुक्त्या करण्याचे आदेश सरकारला दिले. न्यायालयाने या आदेशावर स्थगिती देण्यास नकार देत या सर्व नियुक्त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधिन असतील, असे स्पष्ट केले. 

मॅटचे निरीक्षण वादाला निमंत्रणमॅटने निकालात नोंदविलेल्या सरसकट निरीक्षणाचा विपरीत परिणाम झाला. जास्त गुण मिळालेला मराठा समाजातील एसईबीसी उमेदवार एसईबीसीमधूनही आरक्षण घेण्यास पात्र नाही, हे मॅटचे निरीक्षण अनावश्यक आणि वादाची व्याप्ती वाढविणारे होते, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. 

मॅटच्या चुकीच्या आदेशामुळे...nएसईबीसी श्रेणी घटनाबाह्य ठरविल्यानंतर या आरक्षणांतर्गत राखीव ठेवलेल्या जागा खुल्या प्रवर्गासाठी राखून ठेवण्यात आल्या आणि एसईबीसीमधून अर्ज करणाऱ्या मराठा समाजातील उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे ईडब्ल्यूएसमध्ये समाविष्ट करण्यात आले. nमॅटने अधिक गुण मिळविलेल्या मराठा समाजातील उमेदवारांना अपात्र ठरविले. मॅटच्या चुकीच्या आदेशामुळे असमान परिस्थिती निर्माण झाली, असे म्हणत खंडपीठाने ईडब्ल्यूएसमध्ये समाविष्ट केलेल्या मराठा समाजातील उमेदवारांचा सेवेत नियुक्तीचा मार्ग मोकळा केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHigh Courtउच्च न्यायालय