वसईत बेकायदा रेती वाहतूक करणारे ११ ट्रक जप्त
By Admin | Updated: October 7, 2016 20:03 IST2016-10-07T20:03:36+5:302016-10-07T20:03:36+5:30
रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ११ ट्रकवर पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यावेळी ४ लाख २५ हजार रुपयांची चोरटी रेती आणि १ कोटी ११ लाखाचे

वसईत बेकायदा रेती वाहतूक करणारे ११ ट्रक जप्त
>ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 07 - रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ११ ट्रकवर पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. यावेळी ४ लाख २५ हजार रुपयांची चोरटी रेती आणि १ कोटी ११ लाखाचे ट्रक जप्त करून सर्व चालकांना अटक करण्यात आली.
वसईतून मोठ्या प्रमाणावर रेतीची चोरटी वाहतूक सुरु असल्याची खबर मिळाल्याने पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या पथकाने मुंबई अहमदाबाद हायवेवर विरार फाटा येथे आज संध्याकाळी साफळा रचला होता. यावेळी पथकाने रेतीची चोरटी वाहतूक करणारे ११ ट्रक पकडले. तपासात ट्रकमध्ये चोरीची रेती असल्याचे उजेडात आले.
पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांना आणि विरार पोलिसांना बोलावून ट्रक त्यांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी ट्रक चालकांना अटक केली. तसेच ट्रक मालकांवरही गुन्हे दाखल केले. ४ लाख २५ हजाराची रेती आणि १ कोटी ११ लाख किमतीचे ११ ट्रक जप्त करण्यात आले.