११ अधीक्षक अभियंत्यांना बढती
By Admin | Updated: May 15, 2015 02:12 IST2015-05-15T02:12:56+5:302015-05-15T02:12:56+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागातील ११ अधीक्षक अभियंत्यांना मुख्य अभियंतापदी बढती देण्यात आली. तब्बल १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच या खात्यात बढतीचा निर्णय झाला

११ अधीक्षक अभियंत्यांना बढती
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील ११ अधीक्षक अभियंत्यांना मुख्य अभियंतापदी बढती देण्यात आली. तब्बल १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच या खात्यात बढतीचा निर्णय झाला.
ज्या अधीक्षक अभियंत्यांना पदोन्नती देण्यात आली आहे त्यांची नावे व पदे अशी - पी.एम. किडे - मुख्य अभियंता औरंगाबाद प्रादेशिक विभाग, आर.आर. केडगे - नाशिक प्रादेशिक विभाग, यू.पी. देबडवार - एमएसआरडीसी; मुंबई, बी.एन. ओहोळ - एमएसआरडीसी, एम.एन. डेकाटे - महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ; मुंबई, सी.व्ही. तुंगे - विशेष प्रकल्प मुंबई, एस.एस. जोशी - एमएसआरडीसी; मुंबई, जी.जी. बैरागी - एमएसआरडीसी; मुंबई, एस.के. चॅटर्जी - एमएसआरडीसी; मुंबई, व्ही.एस. देशपांडे - एमएसआरडीसी; मुंबई, ए.बी. गायकवाड - एमएसआरडीसी; मुंबई.
बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, येत्या १० दिवसांत उपअभियंता ते कार्यकारी अभियंता आणि कार्यकारी अभियंता ते अधीक्षक अभियंता अशा पदोन्नती देण्यात येतील. (विशेष प्रतिनिधी)