बालविवाह कारणीभूत ठरलेल्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 20, 2016 20:35 IST2016-04-20T20:35:47+5:302016-04-20T20:35:47+5:30
वर आणि वधू पक्षाकडच्या एकूण ११ जणांवर बोरगाव मंजू पोलिसांनी आज २० एप्रिल, बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बालविवाह कारणीभूत ठरलेल्या ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ऑनलाइन लोकमत
बोरगाव मंजू, दि. २० - बोरगाव मंजू पोलीस ठाणे हद्दीतील दाळंबी येथील एका बालविवाहास कारणीभूत असलेल्या वर आणि वधू पक्षाकडच्या एकूण ११ जणांवर बोरगाव मंजू पोलिसांनी आज २० एप्रिल, बुधवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, दाळंबी येथे आज संध्याकाळी एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार होता. दरम्यान पोलिसांना माहिती मिळाल्यावरून घटनास्थळावर ठाणेदार भास्कर तवर यांनी जाऊन अधिक चौकशी केली असता बालविवाह उघडकीस आला. विवाह होण्याआधीच दोन्हीकडील बालविवाहास कारणीभूत असलेल्या एकूण ११ लोकांविरुद्ध कलम ३, ४, ५, ६ (१) बालविवाह प्रतिबंधक अधिनियम १९२२९ अन्वयसे गुन्हे दाखल करून पुढील तपास ठाणेदार भास्कर तवर, हेकाँ. गणेश निमकर्डे, अवधूत कांबळे हे करीत आहेत.