स्वाइनचे ११ रुग्ण आढळले
By Admin | Updated: February 14, 2015 04:11 IST2015-02-14T04:11:13+5:302015-02-14T04:11:13+5:30
ताप, सर्दी, पडशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिवावर बेतणाऱ्या स्वाइन फ्लूने महाराष्ट्र पोखरायला घेतला. त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यांत १७ दिवसांच्या कालावधीत स्वाइनचे

स्वाइनचे ११ रुग्ण आढळले
सुरेश लोखंडे, ठाणे
ताप, सर्दी, पडशाकडे दुर्लक्ष केल्यामुळे जिवावर बेतणाऱ्या स्वाइन फ्लूने महाराष्ट्र पोखरायला घेतला. त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यांत १७ दिवसांच्या कालावधीत स्वाइनचे सुमारे ११ रुग्ण आढळून आले आहेत. यासाठी सुमारे १० हजार ७७६ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, पालघर परिसरात मृत्यू झालेला रुग्ण अन्य जिल्ह्यातील असल्यामुळे त्याची नोंद आरोग्य विभागाच्या दप्तरी अद्यापही आढळून येत नाही. याशिवाय कल्याण, बदलापूर व नवी मुंबईत झालेले सुमारे तीन मृत्यू केवळ संशयित म्हणून असल्यामुळे त्यांची नोंददेखील अद्याप घेण्यात आलेली नाही. पण, आढळलेल्या स्वाइनच्या रुग्णांची प्रकृती सुधारत असून संशयितांवरही तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयांसह ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये, कुटीर रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंदे्र व उपकेंद्रे आणि खाजगी हॉस्पिटल आदी ठिकाणी सुमारे २३७ तपासणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी सुमारे १० हजार ७७६ जणांची तपासणी केली असता त्यातून सुमारे ११जणांसह तीन संशयित ठिकठिकाणी उपचार घेत आहेत. संशयितांच्या तपासणीमध्ये स्क्रिनेड, स्वाब घेऊन त्यांची तपासणी शासनाच्या चार लॅबसह खाजगी दोन लॅबमध्ये युद्धपातळीवर केली जात आहे.
या ११ रुग्णांपैकी आठ रुग्ण आजमितीस उपचार घेत असून तीन रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांवर त्वरित उपचार करण्यासाठी २४ आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत. यापैकी ठाणे सिव्हील रुग्णालयात सहा वॉर्ड असून ठाणे मनपाचे चार, नवी मुंबईत दोन, रायगडमध्ये तीन तर उल्हासनगर, वसई, भिवंडी या ठिकाणी प्रत्येकी एक वॉर्ड सुरू आहे. येथे नऊ रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी तीन संशयित असल्याचा दावा आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे यांनी केला. नागरिकांनी घाबरण्याची गरज नसून त्वरित औषधोपचार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.