मुंबई - अहमदाबाद महामार्गावर बस अपघातात ११ ठार
By Admin | Updated: May 25, 2015 09:03 IST2015-05-25T08:58:02+5:302015-05-25T09:03:11+5:30
मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन बसमध्ये टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर बस अपघातात ११ ठार
ऑनलाइन लोकमत
पालघर, दि. २५ - मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन बसमध्ये टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. या अपघातात २० जण जखमी झाले असून जखमींवर मुंबई, गुजरात वर तलासरी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातमधील नडीयाद येथील प्रवाशांना घेऊन एक खासगी लक्झरी बस मुंबईकडे येत होती. पहाटे चारच्या सुमारास महाराष्ट्र - गुजरात सीमेवरील अच्छाड गावाजवळ विरुद्ध दिशेने येणा-या मिनी बसने धडक दिली. ही टक्कर ऐवढी भीषण होती की अपघातात ११ प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मिनी बस डिव्हायडर तोडून दुस-या बाजूला गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.