पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 11 ठार
By Admin | Updated: March 11, 2017 07:07 IST2017-03-11T06:25:59+5:302017-03-11T07:07:32+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते.

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 11 ठार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - पुणे-सोलापूर महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे - सोलापूर महामार्गावर उरळीकांचन येथे मुंबईतील मुलुंडहून अक्कलकोटला जाणा-या ज्योती या खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. ही घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. महामार्गावर रानडुक्कर ट्रॅव्हल्सच्या आडवं आल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये पाच महिला आणि पाच पुरुषांसह एका लहान मुलीचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अनेक जण जखमी झाले असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस आणि बचाव दलाचे जवान मदतकार्य करीत आहेत.