शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!
2
दिल्लीत चार मजली इमारत कोसळली, ४ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले
3
Video: धक्कादायक! जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
4
चीन सोबत डील, पॉलिसीमध्ये बदल; ट्रम्प यांनी हार मानली का? अचानक का बदलले त्यांचे सूर
5
करण जोहर दिवसेंदिवस होत चाललाय बारीक, अवस्था पाहून चाहते चिंतेत, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाला…
6
मला झालेला आजार हा अर्धांगवायू नसून...; मंत्र्यांचा दावा खोडत धनंजय मुंडेंनी प्रकृतीबाबत केला खुलासा
7
जगभर: मोकळा आणि प्रदूषणमुक्त श्वास, पॅरिसमधले ५०० रस्ते फक्त चालण्यासाठी!
8
अमेरिकेत भारतीय विद्यार्थी सरकारच्या टार्गेटवर, व्हिसा रद्द झालेल्या जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये ५० टक्के भारतीय
9
World Press Photo of the Year: आई, आता मी तुला मिठी कशी मारू?
10
हृदयद्रावक! ऑटोतून आईसोबत खाली उतरला अन ट्रकने चिमुकल्याला चिरडले; घटनेनंतर तणावाचे वातावरण
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२५: आजचा दिवस आनंदात जाईल, प्रत्येक कामात यश मिळेल
12
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!
13
अग्रलेख: वक्फ कायद्याला झटका, ...तर नव्या कायद्याचा उद्देशच नष्ट होईल
14
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
15
टॅरिफ युद्धात सोन्याचा निर्विवाद विजय! मौल्यवान धातूचा भाव एक लाखाच्या उंबरठ्यावर, सोन्याची आयात तब्बल १९२ टक्क्यांनी वाढली
16
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
17
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
18
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
19
विशेष लेख: डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाचे भारताला किती चटके?
20
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

एसटीच्या चार विभागांचा ११ कोटींचा महसुल पाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 12:55 IST

महाराष्ट्रात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीलाही बसला आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरला सर्वाधिक फटका : एकूण ५० हजार फेऱ्या रद्दऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान

पुणे : अतिवृष्टी व महापुरामुळे एसटी महामंडळाचे अनेक फेऱ्या रद्द केल्याने दहा दिवसांत सुमारे ५० कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. त्यामध्ये पुण्यासह कोल्हापुर, सांगली व सातारा विभागातील तब्बल ५० हजार फेºया झाल्याने ११ कोटींहून अधिक उत्पनावर पाणी सोडावे लागले आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कोल्हापुर विभागाला बसला असून ३० हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.महाराष्ट्रात सर्वदूर सुरू असलेल्या पावसाचा फटका राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीलाही बसला आहे. मराठवाडा वगळता इतर भागामध्ये एसटीची दैनंदिन वाहतूक बहुतांश ठप्प झाली आहे. त्यामुळे एसटीला  दररोजचा ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. अनेक आगार, बसस्थानके, बसेस पाण्यामध्ये अडकल्यामुळे तेथील स्थावर मालमत्तेचेही नुकसान  झाले आहे. एसटीला दररोज २२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. सुमारे ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज एसटी महामंडळाने वर्तविला आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. पाऊस व महापुराचा सर्वाधिक फटका एसटीच्या कोल्हापुर विभागाला बसला आहे. कोल्हापूर विभागाचा दैनंदिन महसूल ५० लाख आहे. परंतु गेल्या चार दिवसापासून या विभागाच्या १२ आगारातून कोणत्याही प्रकारची वाहतूक होऊ शकली नाही. या विभागातील दि. १ ते ९ ऑगस्टदरम्यान सुमारे २९ हजार ५१७ बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे एकूण ३ कोटी ३० लाख रुपयांचा महसुल बुडाला आहे. त्याखालोखाल सांगली विभागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या विभागातील सुमारे ८ हजार फेऱ्या रद्द केल्याने सव्वा चार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. त्यानंतर सातारा विभागातील सुमारे ६ हजार तर पुणे विभागातील सुमारे ४ हजार फेºया रद्द केल्या आहेत. या आगारांतून सांगली व कोल्हापुरसह कर्नाटकडे जाणारी सर्व फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. ५ आॅगस्टपासून एकही बस या दिशेने रवाना झालेली नाही. सोलापुर विभागातूनही सुमारे दीड हजार फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे एकुण ११ कोटी १३ लाख रुपयांचा महसुल बुडाला असून बसस्थानकांचेही नुकसान झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली............

पाच विभागांची दि. १ ते ९ ऑगस्टदरम्यानची स्थितीविभाग                  रद्द फेऱ्या                 बुडालेला महसुलपुणे                    ३९६५                    १,११,३६,९७६सांगली                ८०६०                    ४,२५,९१,५५५कोल्हापुर              २९५१७                 ३,३०,११,२६८सातारा                  ६१८०                   २,१५,१७,६४६सोलापूर                १४७४                   ३०,५६,६९३  

टॅग्स :PuneपुणेDiwakar Raoteदिवाकर रावतेfloodपूरRainपाऊस