शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील विधि अधिकाऱ्यांसाठी ११ कोटींचे लॅपटॉप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 04:43 IST

न्यायालयातील प्रलंबित खटल्यातील कागदपत्रांचा पसारा कमी करण्यासाठी आता राज्यभरातील विविध कोर्टांतील १८५५ विधि (न्यायिक) अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत.

- जमीर काझी मुंबई : न्यायालयातील प्रलंबित खटल्यातील कागदपत्रांचा पसारा कमी करण्यासाठी आता राज्यभरातील विविध कोर्टांतील १८५५ विधि (न्यायिक) अधिकाऱ्यांना लॅपटॉप दिले जाणार आहेत. त्यासाठी सरकारला तब्बल ११ कोटी १३ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. त्याबाबतच्या प्रस्तावाला विधि व न्याय विभागाने हिरवा कंदील दिला आहे. गेल्या सात वर्षांपासून राबविण्यात येत असलेल्या ई-कोर्ट प्रकल्पांतर्गत ही खरेदी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत त्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.उच्च न्यायालयाच्या अपील शाखा ‘हायटेक’ होण्यासाठी २०१३मध्ये न्यायिक अधिकाºयांसाठी १५०९ लॅपटॉपची खरेदी करण्यात आली होती. मात्र त्याच्या वापरासाठी निश्चित केलेला पाच वर्षांचा कार्यकाल संपल्याने नव्याने लॅपटॉप खरेदी करण्याची मागणी विभागाकडून आली होती. तसेच १५०९ अधिकाºयांबरोबरच गेल्या पाच वर्षांत नियुक्ती केलेले व येत्या काही महिन्यांत नव्याने भरती करण्यात येणाºया विधि अधिकाºयांसाठी ही एकत्रित खरेदी करण्याचा निर्णय विभागाकडून करण्यात आला. त्याबाबचा प्रस्ताव गेल्या वर्षी १७ आॅक्टोबरला विधि व न्याय विभागाकडे पाठविण्यात आला होता. शासकीय कामकाजासाठी लागणारी साहित्य सामग्री खरेदी करण्यासाठी उच्चाधिकार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या समितीने नवीन १८५५ लॅपटॉप खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावाला गेल्या महिन्यात २९ तारखेला मंजुरी दिली होती. त्यानुसार राज्यातील विविध न्यायालयांत कार्यरत असलेल्या व नव्याने भरण्यात येणाºया विधि अधिकाºयांसाठी ११ कोटी १३ लाख रुपये किमतीचे लॅपटॉप खरेदीला सरकारने हिरवा कंदील दाखविला.६० हजारांच्या लॅपटॉपची खरेदी वादात सापडणार?सध्या बाजारात सरासरी ३५ हजारांमध्ये चांगल्या किमतीचा व आवश्यक सुविधा असलेला लॅपटॉप उपलब्ध होऊ शकतो. पण विधि व न्याय विभागाने मात्र एका लॅपटॉपसाठी सरासरी ६० हजार रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. इतक्या महागड्या लॅपटॉपची विभागाच्या अधिकाºयांना आवश्यकता नाही, असे संगणक तज्ज्ञाचे मत आहे. त्यामुळे ही खरेदीही वादाच्या भोवºयात सापडण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :laptopलॅपटॉप