शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

११ कोटी ८८ लाख वृक्षाची २४ दिवसांत झाली लागवड- सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 02:02 IST

सर्वात जास्त म्हणजे ७१ लाख ९२ हजार ८९३ इतकी झाडे नांदेड जिल्ह्यात लागली आहेत.

मुंबई : हरित महाराष्ट्राचा ध्यास घेऊन सुरू झालेली वृक्ष लागवड मोहीमेत राज्यभरात २४ दिवसात ११ कोटी ८८ लाख झाडं लागल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. सर्वात जास्त म्हणजे ७१ लाख ९२ हजार ८९३ इतकी झाडे नांदेड जिल्ह्यात लागली आहेत. त्यापाठोपाठ नाशिक जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे ६७ लाख १७ हजार १६३ रोपे लागली तर तिसºया नंबरवर आलेल्या यवतमाळ जिल्हाने ६२ लाख ७१ हजार ७३८ वृक्ष लागवड केली आहे.विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात ५९ लाख ५२ हजार ५५८, गडचिरोली जिल्ह्यात ५१ लाख ९० हजार ७१७ वृक्ष लागवड झाली आहे. उस्मानाबाद, अहमदनगर, नंदूरबार, औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये ४० लाखांहून अधिक वृक्ष लागवड झाल्याचे मुनगंटीवार म्हणाले. या मोहीमेची सांगता ३१ जुलै रोजी होणार असून वनविभागाने १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत १३ कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे.मुनगंटीवार म्हणाले, आतापर्यंत झालेल्या वृक्ष लागवडीमध्ये २८ लाख ५८ हजार २७६ वृक्षस्नेहींनी सहभाग नोंदवला तर १ लाख ४५ हजार ६८३ स्थळांवर ही वृक्ष लागवड झाली आहे. वृक्षलागवडीमध्ये वन विभागाने ६ कोटी ८७ लाख ३८ हजार ८८३, वनेत्तर क्षेत्रात ४ कोटी १४ लाख ४७ हजार १९३, माय प्लांटद्वारे २ लाख ३९ हजार ६१०, रोपे आपल्या दारी कार्यक्रमातून २ लाख ४९ हजार ३७६, हॅलो फॉरेस्ट १९२६ द्वारे ९७७० वृक्ष लागवडीची आॅनलाईन पद्धतीने नोंद झाली आहे तर आॅफलाईन पद्धतीने ८१ लाख ४४ हजार २४६ रोपे लागल्याची माहिती वन विभागाकडे देण्यात आली आहे.राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीपैकी १२ कोटीच्या आसपास वृक्ष लागवड झाली असून हा संकल्प पूर्णत्वाच्या दिशेला वेगाने जात आहे. ३१ जुलै २०१८ पर्यंत राज्यात संकल्पापेक्षा अधिक वृक्षांची लागवड केली जाईल, असा विश्वास वनमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रenvironmentवातावरण