शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

आजपासून दहावीची परीक्षा; ४०० पथकांची कॉपीवर नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 06:22 IST

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे. यंदा ३२ हजार १८९ विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. दहावी परीक्षेसाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे २७१ भरारी पथके स्थापन केली आहेत. यासह महसूल, ग्रामविकास, पाेलिस दल आणि जिल्हाधिकारी यांनीही स्थानिक पातळीवर पथके नेमली आहेत. राज्यभरात अशी एकूण ४०० भरारी पथके परीक्षा कालावधीत हाेणाऱ्या गैरप्रकारांवर लक्ष ठेवणार आहेत, असेही गाेसावी यांनी सांगितले.

राज्य मंडळाच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी लेखी परीक्षेला १ मार्च राेजी सुरुवात होणार आहे. २६ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. २३ हजार २७२ माध्यमिक शाळांमधून १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

अर्धा तास आधी पोहोचाविद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता अर्धा तास अगाेदर परीक्षा केंद्रावर पाेहाेचावे. सकाळी ११ आणि दुपारी ३ वाजता प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात येईल, परीक्षेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात येईल.

टॅग्स :ssc examदहावी