दहावा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आजपासून
By Admin | Updated: June 16, 2017 00:42 IST2017-06-16T00:42:33+5:302017-06-16T00:42:33+5:30
दहावा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आज शुक्रवारपासून येथे सुरू होत आहे. १८ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत

दहावा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आजपासून
- लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : दहावा गोवा मराठी चित्रपट महोत्सव आज शुक्रवारपासून येथे सुरू होत आहे. १८ जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे अभिनेत्री दिव्या दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत कला अकादमीत सायंकाळी साडेसहा वाजता उद्घाटन होणार आहे. आयोजक ‘विन्सन ग्राफिक्स’चे प्रमुख संजय शेट्ये तसेच ज्ञानेश मोघे यांनी येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यंदाच्या महोत्सवासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निवड केली आहे. संचार, टेक केअर गुडनाइट अशा चित्रपटांचे प्रीमिअर शो दाखवणार आहेत. महोत्सवादरम्यान गोदरेजतर्फे अभिनेत्री सई ताम्हणकर यांना उमदा चेहरा या पुरस्काराने गौरविले जाणार आहे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, तसेच अवधूत गुप्ते, सचिन खेडेकर आदी कलाकार महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.