दहावीतील कलचाचणीत आर्चीचा कल कलेकडेच
By Admin | Updated: April 28, 2017 19:18 IST2017-04-28T19:18:45+5:302017-04-28T19:18:45+5:30
मराठी चित्रपट रसिकांना आपल्या ‘सैराट’ अभिनयाद्वारे वेड लावलेल्या ‘आर्ची’ अर्थात प्रेरणा उर्फ रिंकू महादेव राजगुरू हिचा कल कला शाखेकडेच आहे.

दहावीतील कलचाचणीत आर्चीचा कल कलेकडेच
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 28 - मराठी चित्रपट रसिकांना आपल्या ‘सैराट’ अभिनयाद्वारे वेड लावलेल्या ‘आर्ची’ अर्थात प्रेरणा उर्फ रिंकू महादेव राजगुरू हिचा कल कला शाखेकडेच आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या कलचाचणीतून ही माहिती समोर आली आहे.
रिंकूने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. राज्याच्या शिक्षण विभागातर्फे गेल्या शैक्षणिक वर्षापासून दहावीत प्रविष्ट होणा-या प्रत्येक विद्यार्थ्याची कलचाचणी घेतली जात आहे. दहावीनंतर करिअरसाठी कोणते क्षेत्र निवडावे याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण असते. विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे. याबाबतचा अंदाज कलचाचणीच्या माध्यमातून शास्त्रशुध्द पध्दतीने सांगितल्यास उपयुक्त ठरतो. त्यामुळे राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थी यंदा दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. राज्य मंडळातर्फे सर्व विद्यार्थ्यांची कलचाचणी 9 फेब्रुवारी ते 3 एप्रिल 2017 या कालावधीत घेण्यात आली. त्यातच यंदा ‘आर्ची’ने बाहेरून प्रविष्ट होऊन दहावीची परीक्षा दिली. त्यामुळे तिचीही कलचाचणी घेण्यात आली. कल चाचणीचा निकाल http://mahacareermitra.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात आर्चीचा कला/ मानव्यविद्या आणि ललित कला क्षेत्राकडे अधिक कल असल्याचे असल्याचे दिसून आले आहे.
आर्चीच्या कलचाचणी अहवालानुसार तिला कला / मान्यवविद्या क्षेत्रात 100 पैकी 70 गुण असून ललित कला क्षेत्रात 60 गुण आहेत. ग्रामीण भागातील असली आणि ’सैराट’ चित्रपटात अगदी ट्रॅक्टर चालविताना दिसत असली तरी कलचाचणी अहवालात कृषी क्षेत्रासाठी तिला 25 गुण आहेत. ललित कला क्षेत्रापाठोपाठ दिला आरोग्य व जैविक विज्ञान क्षेत्रातील करिअरसाठी 40 गुण आहेत. वाणिज्य क्षेत्रातील करिअरसाठी तिला 35 गुण असून तांत्रिक व गणवेशधारी सेवा क्षेत्रासाठी तिला प्रत्येकी 30 गुण आहेत.