निफाडचे १०८ भाविक अडकले
By Admin | Updated: July 15, 2016 21:01 IST2016-07-15T21:01:54+5:302016-07-15T21:01:54+5:30
श्री संगमेश्वर भक्त परिवारामार्फत अमरनाथ यात्रेसासाठी गेलेले 108 भाविक बाल्टान येथील सुरक्षा दलाच्या कॅम्पमधे अडकून पडले

निफाडचे १०८ भाविक अडकले
ऑनलाइन लोकमत
निफाड (नाशिक), दि. 15 - येथील श्री संगमेश्वर भक्त परिवारामार्फत अमरनाथ यात्रेसासाठी गेलेले 108 भाविक बाल्टान येथील सुरक्षा दलाच्या कॅम्पमधे अडकून पडले आहेत.
बाबा अमरनाथांचे दर्शन घेऊन निघालेल्या या भाविकांच्या गाडीवर श्रीनगर येथे दगडफेक करण्यात आल्याचे या यात्रेकरुमध्ये असलेले निफाड नगरपंचायतीचे नगरसेवक मुकुंद होळकर यानी फोनवरुन सांगितले या यात्रेकरु ना जम्मू येथून नियोजित ठरलेल्या वैष्णोदेवी दर्शनाला जायचे आहे परंतु श्रीनगर मधे कर्फ्यू लागला असल्याने सुरक्षा दलाच्या परवानगी आणि सुरक्षेशिवाय त्यांना जाउ दिले जात नसल्याचे सांगितले आहे.