मिहानसाठी १०५ कोटी

By Admin | Updated: January 21, 2015 00:23 IST2015-01-21T00:23:38+5:302015-01-21T00:23:38+5:30

मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी १०५ कोटी रुपये वितरित करण्यास शासनाने २० जानेवारीला मान्यता दिली आहे.

105 crores for mihan | मिहानसाठी १०५ कोटी

मिहानसाठी १०५ कोटी

नागपूर : मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी १०५ कोटी रुपये वितरित करण्यास शासनाने २० जानेवारीला मान्यता दिली आहे.
यापूर्वी महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाच्या १९ जून २०१३ रोजीच्या बैठकीमध्ये मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिताच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी जवळपास ६४३ कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने वेळोवेळी कळविले आहे. त्यानुसार मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरिता निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. त्याअंतर्गत शासनाने १०५ कोटी रुपये मंजूर केले आहे.

Web Title: 105 crores for mihan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.