शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

Nashik-Pune railway line : नाशिक-पुणे रेल्वे मार्गासाठी १०२३८ कोटींचे अर्थसहाय्य, राज्य शासनाने दिली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 07:15 IST

Nashik-Pune railway line : केंद्र सरकार व राज्य शासनाची महारेल कंपनी यांची या मार्गाच्या उभारणीत संयुक्त भागिदारी असेल. २३१ किलोमीटरच्या या मार्गाच्या उभारणीसाठी १६ हजार ३९ कोटी रुपये इतका खर्च येणार असून, त्यातील ६० टक्के रक्कम ही कर्जरुपाने उभारली जाणार आहे.

मुंबई : नाशिक - पुणे दुहेरी मध्यम अतिजलद (सेमी हायस्पिड) रेल्वे मार्गासाठी पुढील ११ वर्षांत १०,२३८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे राज्य शासनाने ठरवले असून, त्याबाबतच्या मान्यतेचा आदेश गुरुवारी काढण्यात आला.केंद्र सरकार व राज्य शासनाची महारेल कंपनी यांची या मार्गाच्या उभारणीत संयुक्त भागिदारी असेल. २३१ किलोमीटरच्या या मार्गाच्या उभारणीसाठी १६ हजार ३९ कोटी रुपये इतका खर्च येणार असून, त्यातील ६० टक्के रक्कम ही कर्जरुपाने उभारली जाणार आहे. प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरावा, यासाठी या प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होईपर्यंत १०,२३८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.पहिल्या वर्षी ६१५ कोटी आणि त्यात दरवर्षी ८ टक्के वाढ करून दुसऱ्या वर्षी ६६५ कोटी, तिसऱ्या वर्षी ७१७ कोटी असे करत सातव्या वर्षी ९७७ कोटी आणि अकराव्या वर्षी १,३२८ कोटी इतका निधी राज्य शासन स्वत:च्या आर्थिक स्रोतांमधून देणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे.

पुणे - नाशिकरेल्वेमार्गाचे वैशिष्ट्य...- या मार्गावर असतील २४ रेल्वेस्थानके, १८ बोगदे.- पुणे, अहमदनगर, नाशिक या तीन जिल्ह्यांमधून हा मार्ग जाईल.- आळंदी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, सिन्नर, सातपूर या औद्योगिक केंद्रांना जोडणारी रेल्वे.- ताशी २०० किलोमीटर इतका या रेल्वे मार्गावरील गाड्यांचा महत्तम वेग असेल तर सरासरी वेग १४० किमी प्रतितास इतका राहील.

टॅग्स :PuneपुणेNashikनाशिकrailwayरेल्वे