१०१ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त फेब्रुवारीतच

By Admin | Updated: December 31, 2014 01:09 IST2014-12-31T01:09:20+5:302014-12-31T01:09:20+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०१ वा दीक्षांत समारंभ फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. २० फेब्रुवारी रोजी हा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यासाठी

The 101th Convocation ceremony will be held in February only | १०१ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त फेब्रुवारीतच

१०१ वा दीक्षांत समारंभाचा मुहूर्त फेब्रुवारीतच

नागपूर विद्यापीठ : राज्यपाल कार्यालयाकडून मिळाली मंजुरी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०१ वा दीक्षांत समारंभ फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याचे निश्चित झाले आहे. २० फेब्रुवारी रोजी हा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यासाठी राज्यपाल कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्याची माहिती विद्यापीठातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.
नागपूर विद्यापीठाचा १०० वा दीक्षांत समारंभ यशस्वीपणे पार पडला. परंतु हा समारंभ सुमारे वर्षभर लांबल्यामुळे १०१ व्या दीक्षांत समारंभासाठी मुहूर्त कधी निघणार यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मांडण्यात आला होता. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता जानेवारी महिन्यातच हा दीक्षांत समारंभ घेण्यात यावा, असा आग्रह सदस्यांनी धरला होता.
सदर प्रस्ताव राज्यपाल कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. त्याला राज्यपाल कार्यालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
प्रशासकीय इमारतीचा कोनशिला समारंभ ९ जानेवारीला
दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा कोनशिला समारंभ ९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला ठेवण्यात येणार असून यावेळी उद्योजक राहुल बजाज हेदेखील उपस्थित राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या इमारतीच्या बांधकामासाठी बजाज समूहातर्फे ‘सीएसआर’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

Web Title: The 101th Convocation ceremony will be held in February only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.