पोलिसाच्या घरासमोर आढळले 1,000 कूकिंग पॅन
By Admin | Updated: October 12, 2014 03:03 IST2014-10-12T03:03:03+5:302014-10-12T03:03:03+5:30
वरळीतील आदर्शनगर परिसरातील एका पोलीस निरीक्षकाच्या घरासमोर 1 हजार कूकिंग पॅन (तवे) असलेला टॅम्पो भरारी पथकाने शनिवारी जप्त केला.

पोलिसाच्या घरासमोर आढळले 1,000 कूकिंग पॅन
>वरळी कोळीवाडय़ात आयोगाची कारवाई
मुंबई : वरळीतील आदर्शनगर परिसरातील एका पोलीस निरीक्षकाच्या घरासमोर 1 हजार कूकिंग पॅन (तवे) असलेला टॅम्पो भरारी पथकाने शनिवारी जप्त केला. याबाबत रात्री उशिरार्पयत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरळी विधानसभा मतदारसंघातील आदर्शनगर कोळीवाडय़ात एका गल्लीत मतदारांना वाटण्यासाठी टॅम्पोतून साहित्य आणण्यात येत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार अधिका:यांनी छापा टाकला. त्यात त्यांना एका टेम्पोत 1 हजारावर कूकिंग पॅन आढळले. हे साहित्य पोलीस निरीक्षक सुधाकर घागरे यांच्या घरी उतरवून ठेवण्यात येत होते. पथकाने टेम्पोचालकासह अन्य दोघांना ताब्यात घेतले असून, याबाबत रात्री उशिरार्पयत दादर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.