शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

विमानतळासाठी १०० कोटी

By admin | Updated: February 10, 2016 02:32 IST

श्रीसाई शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिर्डी विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी काकडी (ता. कोपरगाव) येथील विमानतळाची उर्वरित कामे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत

मुंबई : श्रीसाई शताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिर्डी विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी काकडी (ता. कोपरगाव) येथील विमानतळाची उर्वरित कामे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत (एमएडीसी) करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी १०० कोटी रुपये सरकारकडून देण्यात येणार आहेत.राज्य शासन आणि श्री साईबाबा संस्थान यांच्यामार्फत आजपर्यंत देण्यात आलेल्या सुमारे २२० कोटींच्या निधीमधून सुमारे २०० कोटी रु पयांचा खर्च कंपनीने केला आहे. उर्वरित २० कोटी रुपये सध्या सुरू असलेल्या कामांवर खर्च होणार आहेत, तसेच इतर कामांसाठी १०० कोटी एवढ्या अतिरिक्त निधीची तरतूद करून विमानतळासाठी ३६४ कोटींच्या खर्चास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता आज देण्यात आली.विमानतळाची उभारणी व विकासातील पहिल्या टप्प्यातील काही कामे पूर्ण झाली असून, इतर कामे मंजूर निधीतून करण्यात येतील. विमान वाहतुकीची भविष्यातील क्षमता, व्याप आणि क्षेत्र विचारात घेऊन, दुसऱ्या टप्प्यांतर्गत विमानतळाच्या धावपट्टीचे आकारमान २२०० मी. बाय ४५ मी. वरून ३२०० मी. इतके वाढविणे, टर्मिनल इमारतीची क्षमता वाढविणे, वाहनतळाची क्षमता वाढविणे, समांतर टॅक्सी-मार्गासाठी सुविधा उपलब्ध करणे, टर्मिनल इमारतीमध्ये बॅगेज स्क्रीनिंग मशीन, पॅसेंजर सिक्युरिटी चेक अरेंजमेंट, विंड डायरेक्शन इंडिकेटर इत्यादी सोईसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.विमानतळाची उभारणी आणि विकासाची कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे परीरक्षण व परिचालन करण्यासाठी विमानतळ कंपनीस स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे विमानतळ चालविण्यासाठी देण्यासही मान्यता देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)शासकीय जमीन विनामूल्य हस्तांतरित करणारश्रीसाई शताब्दी वर्ष २०१७-१८ मध्ये साजरे होणार असून, त्यापूर्वी विमानतळाचे काम पूर्ण व्हावे, म्हणून ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी १०० कोटी एवढे अनुदान मंजूर करून दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. विमानतळासाठी ३५० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, इतर कामे घेण्यासाठी सुमारे २२ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य शिर्डी विमानतळास हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.