शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Maharashtra Budget 2022 : भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयासाठी १०० कोटींचा निधी, अजित पवारांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 15:08 IST

Maharashtra Budget 2022 : या अर्थसंकल्पात गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर  (Lata Mangeshkar) यांच्या नावाने संगीत विद्यालय स्थापन करण्यासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

मुंबई : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास आणि उद्योग या मुद्द्यावर आधारित २०२२-२३ चा अर्थसंकल्प आज महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत सादर केला. यासाठी येत्या तीन वर्षांकरिता चार लाख कोटींची तरतूद करण्यात आली. यातून राज्यात भरीव गुंतवणूक होऊन राज्याचा जीडीपी एक लाख कोटी डॉलर्सपर्यंत वाढेल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, या अर्थसंकल्पात गानसम्राज्ञी भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर  (Lata Mangeshkar) यांच्या नावाने संगीत विद्यालय स्थापन करण्यासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session) सुरू आहे. शुक्रवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवार यांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत स्मारक स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मुंबईत कलिनी विद्यापीठाच्या परिसरात लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच थोर समाजसुधारकांच्या नावाने विद्यापीठात अध्यासने सुरू करण्याचे धोरण सरकारने आधीच सुरू केले आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी होत होती. भाजपचे आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्कात मंगेशकर यांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली होती. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लता दीदींचे स्मारक राज्य सरकार आणि केंद्र सरकार करतीलच, त्याची मागणी करण्याची गरज नाही असे म्हटले होते. तर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी पार्काचे स्मशानभूमी करू नका अशी प्रतिक्रिया दिली होती. आता राज्य सरकारने यावर निर्णय घेतला असून लता दीदींच्या नावाने एक आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यालयासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. 

६ फेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांचे ९२ व्या वर्षा निधन झाले. त्यांना आधी कोरोनाची लागण झाली होती, तर नंतर न्युमोनियाची लागण झाली. ब्रीच कँडी या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी मल्टिपल ऑर्गन फेल्युअरने त्यांचे निधन झाले. मुंबईच्या शिवाजी पार्कात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, शाहरुख खान, रणबीर कपूर, जावेद अख्तरसह अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होते. 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरAjit Pawarअजित पवारMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट २०२२