बलात्कारी पित्याला ठोठावली १० वर्षाची शिक्षा

By Admin | Updated: May 13, 2014 15:20 IST2014-05-13T15:20:16+5:302014-05-13T15:20:16+5:30

अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नराधम पित्याला दिल्ली न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा ठोठावली.

10 years of punishment for raping father | बलात्कारी पित्याला ठोठावली १० वर्षाची शिक्षा

बलात्कारी पित्याला ठोठावली १० वर्षाची शिक्षा

>ऑनलाइन टीम 
नवी दिल्ली, दि. १३ - अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नराधम पित्याला दिल्ली न्यायालयाने १० वर्षाची शिक्षा ठोठावली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश रणजीत कुमार गुप्ता यांनी डीएनए चाचणीच्या आधारे बलात्कारी पित्याला १० वर्षाची शिक्षा आणि २ हजार रूपये दंड ठोठावला. 
बिहारचा मुळ रहिवाशी असलेला आरोपी हा दिल्लीतील उत्तम नगर येथे आपल्या सावत्र मुलीसोबत राहत होता. १३ वर्षाच्या आपल्या मुलीवर धमकी  देवून या नराधम पित्याने सतत बलात्कार केला. यामधून ती मुलगी गर्भवती राहिली. हा सर्व प्रकार २०११ साली उघड झाल्यावर हा प्रकार आपण केलाच नसल्याचे आरोपीने म्हटले होते. पोलिसांनंतर न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर त्या गर्भाच्या डीएनए चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.  १३ वर्षाच्या अल्पवयीन सावत्र मुलीवर नराधम पित्याने सतत तीन ते चार महिने सतत बलात्कार केला होता. यामधून ती गर्भवती राहिली होती. नराधम पित्याविरूध्द मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. 

Web Title: 10 years of punishment for raping father