भांडुपमध्ये १० वर्षांच्या बालिकेवर घरमालकाकडून बलात्कार

By Admin | Updated: November 28, 2014 12:54 IST2014-11-28T12:53:41+5:302014-11-28T12:54:30+5:30

भांडुपमध्ये एका दहा वर्षांच्या बालिकेवर घरमालक व त्याच्या मुलानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे

10 year old girl raped in Bhandup | भांडुपमध्ये १० वर्षांच्या बालिकेवर घरमालकाकडून बलात्कार

भांडुपमध्ये १० वर्षांच्या बालिकेवर घरमालकाकडून बलात्कार

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ - मुंबईतील महिला अद्यापही असुरक्षित असून भांडुपमध्ये एका दहा वर्षांच्या बालिकेवर घरमालक व त्याच्या मुलानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार घडत आहे.

पीडित बालिका पालकांसह भांडुप येथे भाड्याच्या घरात राहते. गेल्या वर्षभरापासून घरमालक व त्यांचा मुलगा तिच्यावर अत्याचार करत होते. सदर घटनेबाबत तक्रार केल्यास जीवे मारू अशी धमकीही त्यांनी तिला दिली होती. मात्र अखेर आज हा प्रकार उघडकीस आला आणि दोन्ही नराधमांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी भांडुप पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित बालिकेच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: 10 year old girl raped in Bhandup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.