१४ वर्षीय मुलाचा दहा वर्षीय मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: July 6, 2014 23:28 IST2014-07-06T22:40:53+5:302014-07-06T23:28:30+5:30

१0 वर्षीय मुलगी घरी एकटी असताना गावातीलच एका १४ वर्षीय मुलाने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केला.

10-year-old girl raped | १४ वर्षीय मुलाचा दहा वर्षीय मुलीवर बलात्कार

१४ वर्षीय मुलाचा दहा वर्षीय मुलीवर बलात्कार

नांदुरा : तालुक्यातील मामुलवाडी येथील एका अल्पवयीन मुलाने दहा वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना आज ६ जुलै रोजी रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. याबाबत मामुलवाडी येथील पीडित मुलीच्या वडिलांनी नांदुरा पोलिस स्टेशनला तक्रार दिली. ३ जुलै रोजी ११.३0 वाजे दरम्यान त्यांची १0 वर्षीय मुलगी घरी एकटी असताना गावातीलच एका १४ वर्षीय मुलाने घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केला. वडिलांच्या तक्रारीवरुन अल्पवयीन आरोपीविरुद्ध नांदुरा पोलिसांनी कलम ३७६, ४५२ भादंविसह कलम ३, ४, बालकांचे लैंगीक शोषण संरक्षण अधिनियम २0१२ नुसार गुन्हा नोंद करून ताब्यात घेतले. याप्रकरणी पुढील तपास डीवायएसपी समिर शेख व ठाणेदार साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ मिलींद सोनोने, गणेश पाटील, हरणे तपास करीत आहेत.

Web Title: 10-year-old girl raped