१0 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

By Admin | Updated: September 28, 2016 02:00 IST2016-09-28T02:00:11+5:302016-09-28T02:00:11+5:30

अकोला जिल्ह्यातील टाकळी खुर्द येथील घटना; चोहोट्टा परिसरात खळबळ .

10-year-old Chimukulli tortured | १0 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

१0 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

चोहोट्टा बाजार(जि. अकोला), दि. २७- जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणार्‍या एका १0 वर्षीय चिमुकलीवर याच गावातील ३0 वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना टाकळी खुर्द येथे सोमवारी दुपारी घडली. या आरोपीस दहीहांडा पोलिसांनी २४ तासाच्या आतच बेड्या ठोकल्या.
दहीहांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टाकळी खुर्द येथील रहिवासी तसेच जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ४ थीला शिकणारी १0 वर्षीय चिमुकली सोमवारी दुपारी जेवणाच्या सुटीदरम्यान तिच्या मैत्रीणीसोबत घरी जाण्यासाठी निघाली होती. दोघीही घराकडे जात असताना वाटेत रुपेश सुभाष खंडेराव (३0) या नराधमाने दोन्ही चिमुकलींना चॉकलेट देण्याचे आमिष देऊन स्वत:च्या घरी नेले. त्यानंतर यामधील एका मुलीला चॉकलेट आणण्यासाठी गावातीलच दुकानावर पाठवले. सोबतची मुलगी चॉकलेट आणण्यासाठी किराणा दुकानावर गेल्यानंतर त्याने दुसर्‍या चिमुकलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी चिमुकलीला दिली. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत चिमुकली घरी आली परंतु आईवडील नसल्याने ती शाळेत गेली. घाबरलेल्या अवस्थेतील चिमुकलीला बघून शाळेतील शिक्षिकांनी तिची विचारपूस केली असता, तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला. त्यानंतर शिक्षकांनी ही माहिती मुलीच्या आई-वडिलांना सांगितली. या माहितीवरू न पीडितेच्या वडिलांनी दहीहांडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. दहीहांडा पोलिसांनी आरोपी रुपेश खंडेराव याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३७६ (लैंगिक अत्याचार), ५११ नुसार गुन्हा दाखल के ला. या घटनेनंतर आरोपी खंडेराव फरार झाला होता; मात्र दहीहांडा पोलिसांनी त्यास २४ तासांच्या आत मंगळवारी सायंकाळी अटक केली. बुधवारी त्याला आकोट येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.

चिमुकलीवर अत्याचार करणार्‍या रुपेश खंडेराव याला अटक करण्यात आली आहे. त्याला बुधवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. आरोपीने चॉकलेटचे आमिष देऊन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत.
जी. के. वनारे,
ठाणेदार,
पोलीस स्टेशन, दहीहांडा.

Web Title: 10-year-old Chimukulli tortured