शनिशिंगणापूरच्या विश्वस्तपदासाठी १० महिलांचे अर्ज

By Admin | Updated: December 20, 2015 00:15 IST2015-12-20T00:15:36+5:302015-12-20T00:15:36+5:30

शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी इतिहासात पहिल्यांदाच १० महिलांसह तब्बल ९७ जणांनी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत.

10 women's application for the trustee of Shanishingnapur | शनिशिंगणापूरच्या विश्वस्तपदासाठी १० महिलांचे अर्ज

शनिशिंगणापूरच्या विश्वस्तपदासाठी १० महिलांचे अर्ज

सोनई (अहमदनगर) : शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी इतिहासात पहिल्यांदाच १० महिलांसह तब्बल ९७ जणांनी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज दाखल करण्याची शनिवारी शेवटची मुदत होती. अखेरच्या दिवशी ८७ पुरुष आणि १० महिलांनी अर्ज सादर केले. त्यात नंदा जगन्नाथ दरंदले, नूतन गोरख शेटे, वैशाली तुकाराम बानकर, अनिता चंद्रहास शेटे, जयश्री सतीश बानकर, साखरबाई संजय दरंदले, लीलाबाई दादा घायाळ, शालिनी राजेंद्र लांडे, द्वारका भुतकर, जयश्री सोमनाथ दरंदले यांचा समावेश आहे. (वार्ताहर)

Web Title: 10 women's application for the trustee of Shanishingnapur