खडसेंच्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी १० हजार लिटर पाण्याची नासाडी
By Admin | Updated: April 15, 2016 18:16 IST2016-04-15T17:35:17+5:302016-04-15T18:16:23+5:30
एकनाथ खडसेंनी वाहनानं प्रवास न करता १५ मिनिटांच्या या प्रवासासाठी हेलिकॉप्टरनेच जाणं पसंत केलं. परंतु खडसेंच्या या हवाई हौसेसाठी तब्बल १० लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली.

खडसेंच्या १५ मिनिटांच्या प्रवासासाठी १० हजार लिटर पाण्याची नासाडी
>ऑनलाइन लोकमत
लातूर, दि. १५ - मराठवड्यातील भीषण दुष्काळामुळे एकीकडे लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी मात्र बिनधास्तपणे पाण्याची उधळपट्टी करत आहेत. राज्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे आज लातूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या लातूर दौऱ्यासाठी तब्बल १० हजार लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.
लातूरनंतर औसा तालुक्याच्या बेलकूंड गावाला ते भेट देणार आहेत. मात्र, याच बेलकूंडमध्ये हेलिपॅड उभारणीसाठी १० हजार लिटर पाण्याची फवारणी करण्यात आली आहे.
लातूर शहरापासून बेलकूंड हे गाव अवघं ४० किलोमीटर लांब आहे. मात्र, खडसेंनी वाहनानं प्रवास न करता १५ मिनिटांच्या या प्रवासासाठी हेलिकॉप्टरनेच जाणं पसंत केलं. परंतु खडसेंच्या या हवाई हौसेसाठी तब्बल १० लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली. लातूरमध्ये भीषण पाणी टंचाई असल्याने सांगलीच्या मिरजमधून दररोज रेल्वेद्वारे १० वॅगन पाणी पोहोचवलं जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसासाठी दोन हजार लिटर पाणी वापल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. परंतु आता त्यांच्याच पक्षाचे नेते आणि मंत्री एकनाथ खडसे यांच्या फक्त हवाई हौसेसाठी १० हजार लिटर पाण्याची नासाडी करण्यात आली आहे.
हद्द है आपकी,बेचारे 40KM बिना हैलिकॉप्टर कैसे जाते भला?
Web Title: 10 thousand liters of water wasted in Khadse's 15-minute journey
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.