वाळीत प्रकरणी १० जणांना अटक

By Admin | Updated: December 20, 2014 03:03 IST2014-12-20T03:03:47+5:302014-12-20T03:03:47+5:30

तालुक्यातील खाजणी येथील विधवा महिला मोहिनी तळेकर यांना वाळीत टाकून आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणातील फरार झालेल्या

10 people arrested in connection with the case | वाळीत प्रकरणी १० जणांना अटक

वाळीत प्रकरणी १० जणांना अटक

रोहा : तालुक्यातील खाजणी येथील विधवा महिला मोहिनी तळेकर यांना वाळीत टाकून आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणातील फरार झालेल्या १० आरोपींना रोहा पोलिसांनी अटक केली. त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. यापूर्वी १५ महिलांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. एकूण ३० जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी पाच जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी सुमंत भांगे, पोलीस अधिक्षक डॉ. शशिकांत महावरकर व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खाजणी गावात गावबैठक घेवून गावात शांतता व कायदासुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले होते. रायगड जिल्ह्यातील वाळीत प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
जिल्ह्यातील एकूण २७ प्रकरणांमध्ये आतापर्यंत २९० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, विजय लोंढे, शंकर जाधव, निखिल तळेकर, गुलाबचंद लक्ष्मण सावंत, गोपीनाथ तळेकर, बाबू गोपाल सकपाळ, तुकाराम लोंढे, चंद्रकांत तळेकर, सतीश लोंढे व विनय लोंढे यांना बुधवारी अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी भांगे यांनी दिली. आरोपींमध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यांना अद्याप अटक झालेली नाही. (वार्ताहर)

Web Title: 10 people arrested in connection with the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.