10 थर लावणा:यांना 25 लाखांचे बक्षीस

By Admin | Updated: August 17, 2014 01:07 IST2014-08-17T01:07:13+5:302014-08-17T01:07:13+5:30

एकीकडे गोविंदा पथकांच्या थरांच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देताच बहुतांश गोविंदा पथकांनी जल्लोष साजरा केला.

10 layers: 25 lakhs prize to them | 10 थर लावणा:यांना 25 लाखांचे बक्षीस

10 थर लावणा:यांना 25 लाखांचे बक्षीस

>ठाणो : एकीकडे गोविंदा पथकांच्या थरांच्या बाबतीत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देताच बहुतांश गोविंदा पथकांनी जल्लोष साजरा केला. हीच संधी साधून दरवर्षीप्रमाणो यंदाही ‘संघर्ष’ प्रतिष्ठानने आपल्या दहीहंडीच्या ठिकाणी 1क् थर लावणा:या गोविंदा पथकाला 25 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे. तसेच या उत्सवात स्पेनचे 2क्क् कॅसरलचे पथकही सहभागी होणार आहे. त्यामुळे ठाण्यात नऊ थरांचा विक्रम कोणते दहीहंडी पथक मोडणार, याकडे आता ठाण्यासह तमाम महाराष्ट्रातील गोविंदा मंडळांचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.  ठाण्यातील ओपन हाउस परिसरातील संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. या ठिकाणी 1क् थर लावणा:या गोविंदा पथकाला 25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले असून नऊ थरांसाठी 15 लाख, 8 थरांसाठी 1 लाख आणि सात थर लावणा:या गोविंदा पथकाला 25 हजार अशी भरघोस बक्षिसे देण्यात येणार असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. महिलांसाठी या ठिकाणी दरवर्षी एक वेगळी हंडी बांधली जाते. त्यानुसार, सात थर लावणा:या महिला पथकाला 1 लाख आणि सहा थर लावणा:या महिलांसाठी 25 हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
 
परदेशी पर्यटकांचीही मांदियाळी..
तसेच अमेरिका आणि इंग्लंडमधून 6क् पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी येथे येणार आहेत. दरम्यान, दहीहंडीच्या दिवशी संघर्षचा गोविंदा उत्सव यू-टय़ूबवर थेट पाहायला मिळणार असल्याचेही संघर्षच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: 10 layers: 25 lakhs prize to them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.