सलाईनसाठी मिळाला १० लाखांचा निधी

By Admin | Updated: January 13, 2015 01:05 IST2015-01-13T01:05:25+5:302015-01-13T01:05:25+5:30

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील दोन महिन्यांपासून सलाईनचा तर आठवड्यापासून स्पिरीटचा तुटवडा पडला आहे. या संबंधीचे वृत्त लोकमतने सोमवारी मेडिकलचे ‘स्पिरीट’

10 lakhs fund for saline | सलाईनसाठी मिळाला १० लाखांचा निधी

सलाईनसाठी मिळाला १० लाखांचा निधी

मेडिकल : पालकमंत्र्यांनी घेतली दखल
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील दोन महिन्यांपासून सलाईनचा तर आठवड्यापासून स्पिरीटचा तुटवडा पडला आहे. या संबंधीचे वृत्त लोकमतने सोमवारी मेडिकलचे ‘स्पिरीट’ हरवले या मथळ्याखाली प्रकाशित करताच खळबळ उडाली. स्वत: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात लक्ष घातले. त्यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याशी संपर्क साधून सोयी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यानुसार सलाईनसाठी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली
मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात औषधांच्या नावाने ठणठणाट आहे. गोरगरीब रुग्णांना पदरमोड करून औषधांची खरेदी करावी लागत आहे. मेडिकलच्या बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात दररोज दोन हजारावर रुग्ण विविध भागातून येतात. परंतु रुग्णालयाच्या औषधालयाकडून लिहून दिलेली निम्मी औषधे मिळत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिजैविकांसाठी तर थेट बाहेरचाच रस्ता दाखविला जातो. आकस्मिक विभागात तर अपघातग्रस्त किंवा अनोळखी व्यक्ती आल्यास त्याचे नातेवाईक येईपर्यंत त्यांच्यावर औषधोपचार थांबविला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विशेष म्हणजे, २०१३ पासून नवे दरपत्र (रेट कॉन्ट्रॅक्ट) लागू न झाल्याने व मेडिकलला औषध व साहित्याचा पुरवठा करणाऱ्या विविध कंपन्यांचे बिल थकल्याने औषधांचा तुटवडा पडला आहे. या विषयी लोकमतने वाचा फोडली.याची दखल अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी घेतली. त्यांनी दुपारी औषध विभागाची बैठक घेऊन स्थिती जाणून घेतली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला. समस्यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी तुर्तास सलाईनची समस्या सोडविण्याची सूचना केली. डॉ. निसवाडे यांनी तत्काळ यासाठी दहा लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 10 lakhs fund for saline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.