मुंबई विमातळावरून १० लाख जप्त

By Admin | Updated: January 24, 2017 04:34 IST2017-01-24T04:34:57+5:302017-01-24T04:34:57+5:30

दुबईला जात असलेल्या प्रवाशावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत सव्वा तीन लाखांचे भारतीय आणि १० हजारांचे युएस डॉलर्स

10 lakh seized from Mumbai insurer | मुंबई विमातळावरून १० लाख जप्त

मुंबई विमातळावरून १० लाख जप्त

मुंबई : दुबईला जात असलेल्या प्रवाशावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत सव्वा तीन लाखांचे भारतीय आणि १० हजारांचे युएस डॉलर्स अशी सुमारे १० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी प्रवाशाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांच्या एका पथकाने दुबईला जाणारे प्रवासी दिपककुमार धीरूभाई ईजारदार यांच्या सामानाची झडती घेतली. ईजारदार यांच्या बॅगेमध्ये भरलेल्या ३ लाख २६ हजार ४०० रुपयांच्या भारतीय चलनी नोटा, तर ६ लाख ७४ हजार रुपये किंमतीचे १० हजार युएस डॉलर्स सापडले. त्यांच्याकडे याबाबत कायदेशीर कागदपत्रे नसल्याने ही रक्कम जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: 10 lakh seized from Mumbai insurer