शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

विजेत्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये - चंद्रशेखर बावनकुळे; लोकमत सरपंच अवॉर्ड्सचे थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 01:24 IST

केंद्र आणि राज्याच्या योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवून गावाचा विकास करणारा सरपंच हा दुवा आहे. गावातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करून गावाचा सर्वांगीण विकास करणाºया सरपंचाचा ‘लोकमत’ने सत्कार केला.

नागपूर : केंद्र आणि राज्याच्या योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवून गावाचा विकास करणारा सरपंच हा दुवा आहे. गावातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करून गावाचा सर्वांगीण विकास करणाºया सरपंचाचा ‘लोकमत’ने सत्कार केला. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या सरपंचांच्या ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली.लोकमत समूहातर्फे शुक्रवारी गांधीसागर तलाव महाल येथील रजवाडा पॅलेस येथे ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ची घोषणा व वितरण करण्यात आले.या वेळी नागपूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट १३ सरपंच तसेच संपूर्ण वर्गवारीत उत्कृष्ट काम करणाºया एका सरपंचाला ‘सरपंच आॅफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा होते.विदेशातील लोकांचा गावातच राहण्यावर भर असतो. येथे मात्र लोक गाव सोडून शहरात येत आहेत. कारण गावांमध्ये रोजगार आणि सोई-सुविधा नाही. त्यामुळे शहरे वाढत असून गावे भकास होत आहेत. शहरात झोपडपट्ट्यांची समस्या वाढत आहे. हे चित्र बदलण्याची क्षमता ग्रामपंचायतीमध्ये आहे. ग्रामपंचायत सरपंच चालवतात.त्यामुळे सरपंचाची भूमिका ही सर्वांत महत्त्वाची आहे. गावातच रोजगार व सुविधा मिळाल्या, चांगल्या शाळा, शिक्षक, स्वच्छ पाणी व शौचालय, चांगले रस्ते तयार झाले तर गाव सोडून कुणीही शहरात जाणार नाही, असा विश्वास विजय दर्डा यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेLokmat Sarpanch Awardsलोकमत सरपंच अवॉर्डस्