मुंबई : राज्य पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘कॉम्प्युटराझेशन आॅफ पब्लिक प्रोसुक्शन आॅफिसेस’ प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून कार्यरत असलेल्या पीडब्ल्यूसी कंपनीला दहा लाख ५७ हजार ७५२ रुपयांचे देयक मंजूर करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या कार्यपूर्तीसाठी कंपनीबरोबर मानधन तत्त्वावर करार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.पोलीस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून, त्याबाबत पीडब्ल्यूसी कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून १४ जून, २०१८ रोजी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या प्रकल्पासंदर्भात अंतिम प्रकल्प अहवाल मसुदा तयार करण्याचे काम कंपनीच्या वतीने सुुरू आहे.
राज्य पोलीस दलाच्या सल्लागार कंपनीचे १० लाखांचे बिल मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 00:33 IST