शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जड वाहनांवरील पथकरात १० टक्के वाढ ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 08:02 IST

पथकरात १० टक्के वाढ करताना वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांच्या तुलनेत कमीच असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या नाक्यांवर पथकरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. ही वाढ केवळ जड वाहनांसाठीच असेल. कार, जीप, एसटी बस, स्कूल बस व हलकी वाहने यावरील पूर्वी असलेली सूट कायम राहील.

पथकरात १० टक्के वाढ करताना वाढीव दर हे राष्ट्रीय महामार्गावरील पथकरांच्या तुलनेत कमीच असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. सध्या बांधकाम विभागाच्या अखत्यारितील १५ प्रकल्पांतर्गत वाहनांना पथकरातून सूट दिली जाते. त्यामुळे शासनाला दरवर्षी सुमारे ४०० कोटी रुपयांची भरपाई कंत्राटदारास द्यावी लागते. ही नुकसान भरपाई रोखीने न देता जड वाहनांवरील पथकर काही प्रमाणात वाढविण्याचा तसेच पथकर वसुलीसाठी वाहनांचे प्रकारही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भरपाईपोटी सरकारच्या तिजोरीवर येणारा भार कमी होणार आहे.

आतापर्यंत १) कार, जीप, टाटा सुमो, कमांडर, ट्रॅक्स, वाहनचालक वगळून असलेली सहा आसनी प्रवासी रिक्षा व इतर तत्सम वाहने २) मिनी बस किंवा तत्सम वाहने ३) दोन आसांचे ट्रक, बस ४) तीन आसांची अवजड वाहने, असे चार प्रकार होते. आता ट्रक-ट्रेलर, तीनपेक्षा अधिक आसांची वाहने हा पाचवा प्रकार नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.

थकबाकी वसुलीसाठी सवलत योजनाn राज्यातील शेतकऱ्यांना एक लाख नवीन कृषीपंप जोडण्या देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तसेच, तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने सर्व कृषी पंपांना दिवसा कायमस्वरुपी आठ तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांकडे असलेली कृषी पंपांची वीजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी सवलती देणारी योजनाही मंत्रिमंडळाने मंजूर केली.n सध्याच्या कृषी पंपांना कॅपॅसिटर बसविण्यात येतील. पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी १,५०० कोटी या प्रमाणे २०२४ पर्यंत भागभांडवल महावितरण कंपनीस देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला. सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख सौर कृषीपंप देण्यात येणार आहेत. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार