पुण्यात रंग लावलेली 1 टन भाजी जप्त
By Admin | Updated: July 25, 2014 01:35 IST2014-07-25T01:35:50+5:302014-07-25T01:35:50+5:30
अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गुलटेकडी मार्केट यार्डातून कृत्रिम हिरवा रंग लावलेल्या पडवळ या भाजीचा तब्बल 1 हजार 12क् किलोचा साठा गुरुवारी जप्त केला.

पुण्यात रंग लावलेली 1 टन भाजी जप्त
पुणो : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) गुलटेकडी मार्केट यार्डातून कृत्रिम हिरवा रंग लावलेल्या पडवळ या भाजीचा तब्बल 1 हजार 12क् किलोचा साठा गुरुवारी जप्त केला. कोलकाता येथून या भाजीची आवक झाली होती. मोठय़ा हॉटेल्सना या भाजीचा पुरवठा करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
कोलकाता येथून आझाद हिंद एक्स्प्रेसने कृत्रिम रंग लावलेला भाजीपाला शहरात येणार असल्याची माहिती एफडीएला समजली होती. भाजी गाळ्यावर उतरताच एफडीएने छापा घातला. त्यात 22 हजार 4क्क् रुपये किमतीची 1112क् किलो (16 गोणी) पडवळ जप्त करण्यात आले, अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली. रामवाडी, हडपसर येथील दिशा वेस्ट येथे हा भाजीपाला नष्ट करण्यात आला. अलीकडे एफडीएने प्रथमच कृत्रिम रंग लावलेल्या भाजीचा एवढा मोठा साठा जप्त केला आहे.