नगरमध्ये सापडले 1 कोटीच्या जुन्या नोटांचे घबाड
By Admin | Updated: May 21, 2017 13:59 IST2017-05-21T13:59:03+5:302017-05-21T13:59:11+5:30
नोटाबंदीनंतरही जुन्या नोटा लोकांकडे कायम असल्याचे चित्र विविध ठिकाणच्या घटनांवरुन उघड होत आहे.

नगरमध्ये सापडले 1 कोटीच्या जुन्या नोटांचे घबाड
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि. 21 - नोटाबंदीनंतरही जुन्या नोटा लोकांकडे कायम असल्याचे चित्र विविध ठिकाणच्या घटनांवरुन उघड होत आहे. नगरमध्येही जुन्या नोटांचे 1कोटी रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे.
सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोडवरील श्री संत नामदेव नगरपरिसरात कांदा, बटाट्यांचा व्यापारी संजय शेलार यांच्याकडून पोलिसांनी 1 कोटी रुपयांच्या नोटा पकडल्या़ सकाळी 11 वाजता तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली.
पुणे येथे नालेसफाई सुरु असताना जुन्या नोटा सापडल्याची घटना ताजी असतानाच नगरमध्येही जुन्या नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे़ या नोटा कुठून आल्या, या नोटा व्यापाऱ्याच्याच आहेत की अन्य कोणाच्या याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.