शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रोखपालाने उडवले १ कोटी १७ लाख, चंद्रपूर जिल्हा बँकेत ‘सर्व्हर डाऊन’च्या नावाखाली मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 06:02 IST

Chandrapur district bank : या रोखपालाने आतापर्यंत १ कोटी १७ लाख रुपयांवर हात साफ केल्याची बाब शुक्रवारी उजेडात आली.

चंद्रपूर : रक्कम विड्राॅल करण्यासाठी येथील जिल्हा परिषदेसमोरील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत गेलेल्या ग्राहकांना सर्व्हर डाऊन झाल्याची बतावणी करीत त्यातील काही रकमेवर डल्ला मारण्याचा प्रताप रोखपालाकडून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. या रोखपालाने आतापर्यंत १ कोटी १७ लाख रुपयांवर हात साफ केल्याची बाब शुक्रवारी उजेडात आली.निखिल घाटे असे या रोखपालाचे नाव आहे. बँकेत मोठी रक्कम विड्राॅल करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना हेरून त्यांनी विड्राॅल केलेली पूर्ण रक्कम न देता त्यातील काही रक्कम तो स्वत: ठेवून घेत असे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे पूर्ण रक्कम देता येत नसल्याचे कारण सांगून तसे लिहूनही देत होता. संबंधित ग्राहकांनी अधिकृत तक्रार न केल्यामुळे हा प्रकार बिनधोक सुरूच होता. शुक्रवारी एका सोसायटीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. व्ही. पोटे यांच्याकडे तक्रार केली. यानंतर पोटे यांनी सायंकाळी बँक गाठून चौकशी केली असता त्यांना धक्काच बसला. रोखपालाने १ कोटी १७ लाख रुपयांची रक्कम लाटली असल्याची प्राथमिक माहिती चौकशीत पुढे आल्याचे समजते. त्याने ४८ लाख रुपये जमा केल्याचीही माहिती आहे. या प्रकरणाची अंतर्गत चौकशी पोटे करीत असून चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी ‌‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :MONEYपैसाbankबँक