अकोला, दि. २0- महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकृत असलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरीची सोडत मंगळवार, २0 सप्टेंबर रोजी जाहीर झाली. या सोडतीत जाहीर झालेले १ कोटी ११ लाख ५१ हजारांचे लॉटरीचे तिकीट अकोल्यातूनच विकल्या गेले असल्याने, 'तो' भाग्यवान विजेता कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य शासनाने खास गणेशोत्सवानिमित्त १ कोटी ११ लाख ५१ हजारांचे प्रथम बक्षीस जाहीर केले होते. मंगळवारी जाहीर झालेल्या या बक्षिसाच्या 0५ सीरीजचे असून तिकिटाचा क्रमांक 0५३६८ असा आहे. हे तिकिट न्यू ईरा हायस्कूलजवळील केदार-मंदारअपार्टमेंटमधील जलाराम लॉटरी सेंटर येथून विकल्या गेले असल्याची माहिती दुकान मालक देवकरण जीवनभाई पोपट यांनी लोकमतला दिली. या क्रमांकाचे लॉटरीचे तिकीट खरेदी करणारा तो भाग्यवान विजेता कोण, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाग्यवान विजेता हा अकोल्याचाच रहिवासी असल्याची शक्यता देवकरण पोपट यांनी व्यक्त केली.
१ कोटीं ११ लाखाचा भाग्यवान अकोल्यात!
By admin | Updated: September 21, 2016 02:35 IST