रेल्वे पासवर १ जानेवारीपासून ०.५ टक्के सूट
By Admin | Updated: December 30, 2016 01:04 IST2016-12-30T01:04:28+5:302016-12-30T01:04:28+5:30
रेल्वेत कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पास खरेदीवर 0.५ टक्के सूटही देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आता १ जानेवारीपासून मुंबई उपनगरीय

रेल्वे पासवर १ जानेवारीपासून ०.५ टक्के सूट
मुंबई : रेल्वेत कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पास खरेदीवर 0.५ टक्के सूटही देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आता १ जानेवारीपासून मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर केली जाईल, अशी माहिती देण्यात आली. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे पास काढणाऱ्यांना ही सवलत मिळेल. मूळ रकमेत ही सूट जाहीर केली आहे.
एमयूटीपी सरचार्ज, सेवा कर आदींसारखे अन्य शुल्क देय असल्यास, मूळ बिलाच्या रकमेतून 0.५ टक्के सूट दिल्यानंतर, हा कर आकारला जाणार आहे. (प्रतिनिधी)