शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन केंद्रीय मंत्र्यांसह ७ खासदार रिंगणात, काँग्रेसचं आव्हान मोडण्यासाठी भाजपानं आखला असा प्लॅन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 10:21 IST

Madhya Pradesh Assembly Election: यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने ३९ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पक्षाने मोठा प्रयोग करताना ३ केंद्रीय मंत्र्यांसह एकूण ७ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

यावर्षाच्या अखेरीस होणाऱ्या मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने ३९ उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पक्षाने मोठा प्रयोग करताना ३ केंद्रीय मंत्र्यांसह एकूण ७ खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. मातब्बर केंद्रीय मंत्र्यांसह खासदारांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट देऊन भाजपानेकाँग्रेसकडून मिळणाऱ्या कडव्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. उमेदवारी देण्यात आलेल्या नेत्यांपैकी अनेकजण आपापल्या मतदारसंघातून सातत्याने विजय मिळवत आलेले आहेत. तसेच त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे अनेक अर्थ निघत आहेत. 

भाजपाने आपल्या दुसऱ्या उमेदवारी यादीमध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना दिमनी येथून, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना नरसिंहपूर येथून, केंद्रीय मंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांना निवास येथून, खासदार गणेश सिंह यांना सतना येथून, खासदार रीती पाठक यांना सीधी येथून, राकेश सिंह यांना जबलपूर पश्चिम येथून आणि खासदार उदय प्रताप सिंह यांना गाडरवारा येथून उमेदवारी दिली आहे. 

भाजपाने काल प्रसिद्ध केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीमध्ये केवळ ३ ठिकाणी भाजपाचे आमदार होते. मागच्या निवडणुकीत सीधी, नरसिंहपूर आणि मेहर येथे भाजपाला विजय मिळाला होता. तर ३६ जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत. मात्र भाजपाने आपल्या तिन्ही विद्यमान आमदारांना तिकीट दिलेलं नाही. नारायण त्रिपाठी यांचं तिकीट पक्षविरोधी विधानांमुळे कापण्यात आलं. तर   आदिवासी व्यक्तीवर केलेल्या मुत्रविसर्जनामुळे केदार शुक्ल यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. तर नरसिंहपूर येथून जालम पटेल यांच्या जागी त्यांचे ज्येष्ठ बंधू प्रल्हाद पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

भाजपाने केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि फग्गन सिंह कुलस्ते यांच्यासह एकूण सात खासदारांना उमेदवारी दिली आहे. या नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचं कारण म्हणजे त्यांचं त्या त्या भागामध्ये बऱ्यापैकी वर्चस्व आहे. यामधील बहुतांश नेते आपल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये सातत्याने विजयी होत आलेले आहेत. त्यामुळे या नेत्यांनी निवडणूक लढवल्यास त्याचा प्रभाव आजूबाजूच्या मतदारसंघांवरही पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्षाच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते.

उमेदवारांच्या दुसऱ्या यादीबरोबरच भाजपाने मध्य प्रदेश विधानसभेच्या २३० जागांपैकी ७८ जागांवर आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात प्रस्तावित आहेत. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक