शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचे फोटो काढले, मारहाण, बलात्काराचा प्रयत्न, विरोध केल्यावर नराधमांनी धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 12:24 IST

Crime News: मुझफरपूर येथून गुजरातला जाणाऱ्या सूरत एक्स्प्रेसमध्ये नराधमांनी एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने विरोध केला. तेव्हा या नराधमांनी या महिलेसह तिच्या नातेवाईकाला ट्रेनमधून खाली फेकून दिले.

उत्तर प्रदेशमधील मुझफरपूर येथून गुजरातला जाणाऱ्या सूरत एक्स्प्रेसमध्ये नराधमांनी एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा महिलेने विरोध केला. तेव्हा या नराधमांनी या महिलेसह तिच्या नातेवाईकाला ट्रेनमधून खाली फेकून दिले. आता पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ग्वाल्हेरमधील बिलोआ पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली आहे. ही महिला झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील रहिवासी असून, १९ जून रोजी ती तिच्या नातेवाईकासोबत सूरत एक्स्प्रेसमधून लखनौ येथून गुजरातला जात होती. दरम्यान, ग्वाल्हेर येथे पाच जण ट्रेनमध्ये चढले. ते महिलेच्या समोरील सीटवर बसले. काही वेळाने आरोपींनी महिलेसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

पीडितेने बिलौआ पोलीस ठाणे पोलिसांना सांगितले की, आरोपी माझे फोटो काढतत होते. मी विरोध केला तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या नातेवाईकांना मारहाण केली. त्यानंतर ही महिला आणि तिचा नातेवाईक दरवाजाजवळ जाऊन थांबले. तेव्हा आरोपींनी तिथे येत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.मात्र महिलेने त्यांना विरोध केला तेव्हा आरोपींनी या महिलेला आणि तिच्या नातेवाईकाला धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकले. ही महिला आणि तिचा नातेवाईक संपूर्ण रात्रभर रेल्वेच्या रुळांवर बेशुद्धावस्थेत पडून होते. सकाळी ग्रामस्थांनी त्यांना पाहिले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. ही महिला आणि तिच्या नातेवाईकाला गँगमन आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात पोहोचवले.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला. ग्वाल्हेरचे एसपी राजेश सिंह चंदेल यांनी एसडीओपी डबरा आणि बिलौआचे ठाणे प्रभारी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ट्रेनच्या डब्यात किती लोक होते. या घटनेत कोण कोण सहभागी होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndian Railwayभारतीय रेल्वे