शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मुलगी न झाल्याने संताप; पित्याकडून १२ दिवसांच्या मुलाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 16:09 IST

भोपाळ - मुलगा हा वंशाचा दिवा असतो, त्यामुळे मुलाच्या जन्मानसाठी प्रत्येक कुटुंबाचा आग्रह असतो. त्यातून, भारतात स्त्री भ्रूण हत्येच्या ...

भोपाळ - मुलगा हा वंशाचा दिवा असतो, त्यामुळे मुलाच्या जन्मानसाठी प्रत्येक कुटुंबाचा आग्रह असतो. त्यातून, भारतात स्त्री भ्रूण हत्येच्या बहुतांश घटना घडल्या आहेत. आजही समाजात मुलगी नको, मुलगाच हवा.. असा काहींचा समज असल्याचं पाहायला मिळते. त्यातूनच गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्येच्या घटना घडतात. तर, स्त्री जन्माचे स्वागतही अनेक कुटुंबात मोठ्या जल्लोषात केल्याचं पाहायला मिळत आहे. अलीकडे समाजाची मानसिकता बदलली असून मुलींच्या जन्माचे स्वागत उत्साहात व आनंदात होत असल्याचं दिसून येतं. मात्र, मुलगी न झाल्याने एका पित्याने चक्क नवजात मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

मध्य प्रदेशच्या बैतुल जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना असून दारुच्या नशेत वडिलांनी जन्मलेल्या बाळाचा खून केला. कोतवाली तालुक्यातील बज्जारवाड गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुलगी न झाल्यामुळे निराश झालेल्या बापाने हे निर्दयी कृत्य केलं. या व्यक्तीला यापूर्वीच दोन मुले असून तिसऱ्या वेळेस आपणास मुलगी व्हावी, अशी त्याची इच्छा होती. 

अनिल उईके असे या निर्दयी बापाचे नाव असून त्याने आपल्या पत्नीलाही मारहाण केली. मुलाच्या जन्मानंतर राग अनावर झालेल्या अनिलने पत्नीला मारहाण करत, तिच्याकडून आपल्या १२ दिवसांच्या मुलाला ओढून घेतले. पतीचा हा अवतार पाहून पत्नी घरातून बाहेर निघून गेली होती. मात्र, काही वेळानंतर घरात आल्यावर तिने पाहिले असता, तिचा लहान मुलगा मृतावस्थेत आढळून आला, अशी माहिती फिर्यादीच्यावतीने पोलिसात दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, लहान बाळाच्या गळ्याभोवती हाताच्या बोटाचे निशाण दिसून येत आहेत. याप्रकरणी, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपी अनिल उईके यास अटकही करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेश