शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; तीन हेलिपॅडही बांधले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 11:36 IST

डॉ.मोहन यादव बुधवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये तयारी करण्यात येत आहे. दोन हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मोठा स्टेज तयार केला जात आहे. जिथे दोन डझनहून अधिक प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. येथील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला भाजपाचे कार्यकर्ते आणि सामान्य जनताही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा अधिकृत कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, डॉ.मोहन यादव बुधवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच उपमुख्यमंत्री आणि काही मंत्रीही शपथ घेऊ शकतात. नवीन मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मोहन यादव यांनी राज्यपाल मंगूभाई पटेल यांची भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. तत्पूर्वी शिवराज सिंह चौहान यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.

रेड परेड ग्राउंडमध्ये तीन हेलिपॅड बांधले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी लाल परेडमध्ये तीन हेलिपॅड बांधले जात आहेत. वरिष्ठ नेत्यांचे हेलिकॉप्टर येथेच उतरणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर डॉ. मोहन यादव यांनी शिवराज सरकारचे काम पुढे नेण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले होते. यादव म्हणाले की, ते भाजपाचे सैनिक आहेत. भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे, जो आपल्या कार्यकर्त्यांची काळजी घेतो.

कोण आहेत मोहन यादव?

मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अर्थात मोहन यादव २०१३ मध्ये पहिल्यांदा उज्जैन दक्षिण मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी आमदार होण्याचा मान पटकावला. २०२० मध्ये त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले. यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा याच जागेवरून निवडणूक जिंकली. अशातच आता पक्षाने त्यांना मुख्यमंत्री करून राजकीय पंडितांना देखील धक्का दिला.

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश