पेपरफुटी तरुणांसाठी बनला शाप; काँग्रेस भरतीप्रक्रियेसाठी व्हिजन डॉक्युमेंट आणणार : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 09:57 AM2024-03-06T09:57:10+5:302024-03-06T09:57:57+5:30

पेपरफुटीच्या अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर आपला पक्ष भरतीप्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी एक ठोस योजना तयार करत असून, याबाबत लवकरच व्हिजन डॉक्युमेंट आणले जाईल, असे राहुल म्हणाले.

Paperfoot became a curse for the youth; Congress will bring a vision document for the recruitment process: Rahul Gandhi | पेपरफुटी तरुणांसाठी बनला शाप; काँग्रेस भरतीप्रक्रियेसाठी व्हिजन डॉक्युमेंट आणणार : राहुल गांधी

पेपरफुटी तरुणांसाठी बनला शाप; काँग्रेस भरतीप्रक्रियेसाठी व्हिजन डॉक्युमेंट आणणार : राहुल गांधी

शाजापूर (मध्य प्रदेश) : लोकसंख्येत ९० टक्के वाटा असलेल्या मागास, दलित आणि इतर प्रवर्गांतील सदस्यांकडे कोणतीही महत्त्वाची पदे नसून, आज देशातील प्रत्येक संस्थेत सामाजिक अन्याय सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी  मंगळवारी केला.

पेपरफुटीच्या अलीकडील घटनांच्या पार्श्वभूमीवर आपला पक्ष भरतीप्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी एक ठोस योजना तयार करत असून, याबाबत लवकरच व्हिजन डॉक्युमेंट आणले जाईल, असे राहुल म्हणाले.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल यांनी शाजापूर येथे एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. गेल्या सात वर्षांत ७०हून अधिक पेपरफुटीच्या घटनांनी दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे, असेही ते म्हणाले. 

मोदींच्या घोषणा, फ्लाइंग किस
भाजप समर्थकांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या. घोषणा ऐकून राहुल यांनी ताफा थांबवला व भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्याशी हस्तांदाेलन करत संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यानंतर पुढे जाण्यापूर्वी राहुल त्यांच्या वाहनातून भाजप कार्यकर्त्यांना ‘फ्लाइंग किस’ देताना दिसले.

९०% असताना मालक आहात? 
‘देशातील मागासवर्गीयांची लोकसंख्या किती आहे? ती ५० टक्के आहे,  त्यानंतर दलित १५ टक्के, अनुसूचित जमाती ८ टक्के व अल्पसंख्याक १५ टक्के गृहित धरल्यास हे प्रमाण  सुमारे ९० टक्क्यांवर जाते. आता तुम्ही अव्वल उद्योगपतींची यादी काढली व देशातील आघाडीच्या कंपन्यांचे व्यवस्थापन मंडळ तपासले, तर तुम्हाला त्यात या ९० टक्के श्रेणीतील एकही व्यक्ती सापडणार नाही, “माध्यमांतही अशीच परिस्थिती आहे, असेही गांधी म्हणाले.
 

Web Title: Paperfoot became a curse for the youth; Congress will bring a vision document for the recruitment process: Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.