शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

MP मध्ये 'मामां'चीच 'भुरळ', राज्यात पुन्हा फुलणार भाजपचं कमळ? ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला झटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 21:54 IST

एक ओपिनियन पोलही समोर आला आहे. यात काँग्रेसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेतून मुख्यमंत्री  शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

मध्य प्रदेशात नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी भाजपने गेल्या महिन्यातच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच आता एक ओपिनियन पोलही समोर आला आहे. यात काँग्रेसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेतून मुख्यमंत्री  शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलणार? -आयएएनएस-पोलस्ट्रॅटने मध्य प्रदेसातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत एकूण 7,883 लोकांनी आपली मतं नोंदवली आहेत. सर्व्हेनुसार, आगामी निवडणुकीत भाजपला 120 जागा मिळू शकतात. अर्थात, सर्व्हेतील हा आकडा खरा ठरला, तर भाजप विजयासाठी आवश्यक असलेला आकडा (116) पार करून, पुन्हा एकदा मध्यप्रदेशात सरकार स्थापन करू शकते. या सर्व्हेत, भाजपला किमान 116 ते 124 जागा मिळू शकतात. तसेच, काँग्रेसच्या पारड्यात 104 जागा जाण्याचा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. 

मामांची भुरळ अथवा जादू कायम -या सर्व्हेत एमपीतील लोकांना सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यासंदर्भात विचारण्यात आले, यावर तब्बल 40 टक्के लोकांनी शिवराज सिंह चौहान हे आपले फेव्हरिट नेते असल्याचे सांगितले. तर 35 टक्के लोकांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते कमलनाथ यांचे नाव सांगितले. अर्थात या सर्व्हेनुसार राज्यात मामांचीच भुरळ अथवा जादू कायम आहे. तसेच यात 47 टक्के लोकांनी सीएम शिवराज यांच्या कामाचे कौतुक केले आहे. तर 24 टक्के लोकांनी त्यांचे काम सर्वसाधारण असल्याचे म्हटले आहे. तर 29 टक्के लोकांनी मामाच काम खराब असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपाcongressकाँग्रेस